ही विधानसभा निवडणूक महाडमधील थांबलेल्या विकासाचं चित्र बदलण्यासाठी नामी संधी आपल्याला देणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आहे. राज्यभरात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेची लढाई या निवडणूकीच्या निमित्ताने लढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेल्या संविधानाला अनुसरुन कायद्याचे राज्य असणारा महाराष्ट्र घ़डविणे, देशात आपल्या राज्याला पुन्हा क्रमांक एकवर नेण्यासाठी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी या मतदारसंघातील बलाढ्य प्रस्थापितांना बाजूला करण्यासाठी मला आपले आशीर्वाद हवे आहेत. आपली मोलाची साथ हवी आहे. त्यासाठी हा पत्ररुपी संवाद. महाड विधानसभा मतदारसंघाने गेली पंधरा वर्षे खुप काही सहन केले आहे आता या मतदारसंघाला गरज आहे बदलाची. तुमच्या साथीने हा बदल घडवून आणण्याची संधी मी आपणाकडे मागत आहे.
अधिक वाचास्नेहलदिदी त्यांच्या वडिलांचा, माणिकराव तथा आबा जगताप यांचा वारसा पुढे चालवत आहेत. महाड विधानसभेचे माजी आमदार असलेल्या आबा यांना त्यांच्या निःस्वार्थ सेवा, जनहिताचे कार्य आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे महाड विधानसभेत विशेष मान होता. समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांच्या संघर्षशील कामामुळे आणि मदतीमुळे ते लोकांच्या मनात घर करून गेले.
आबांच्या पावलांवर पाऊल ठेवून स्नेहलदिदी समाजसेवा करत आहेत. महाडमध्ये आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांना संघर्षकन्या म्हणून ओळखले जाते. अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी महाडच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून लोकसेवेसाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या वडिलांच्या आदर्शांचा सन्मान करून, स्नेहल जगताप महाडमधील जनतेसाठी त्यांचाच दृष्टिकोन पुढे नेत आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आधारभूत सुविधा: रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचा विकास.
रोजगार: महा नोकरी मेळावा सारख्या उपक्रमांद्वारे रोजगार संधी निर्माण करणे.
आपत्ती व्यवस्थापन: पुरासारख्या आपत्तींसाठी तयारी व मदत यंत्रणा.
युवक सक्षमीकरण: कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन.
आरोग्य व स्वच्छता: उत्तम आरोग्यसेवा आणि स्वच्छता सुविधा.
महिला सक्षमीकरण: महिला सुरक्षेसाठी विशेष उपक्रम.
पर्यावरण: पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास.
शेती आणि शेतकरीः शेतीला आधुनिकतेची जोड आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ.